फॅमिली स्टोअर्स !!!
मुंबईला दादर स्टेशनजवळ पश्चिमेला छबिलदास शाळेलगतच्या कोप-यावर आमच फॅमिली स्टोअर्स हे दुकान उभ असलेल तुम्हाला दिसेल. दादरला सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे एकत्र येत असल्यामुळे स्थानिक ग्राहकांन बरोबर कल्याण व विरार ईथपर्यंतच्या उपनगरातून येणा-या मध्यमवर्गीय मराठी ग्राहकांची इथे दिवसभर ये जा असते. ज्या विश्वासाने व जिव्हाल्याने ग्राहक इथे येतात व्यवहाराव्यतिरीक्त चार प्रेमाचे शब्द आमच्याशी बोलतात ते पाहून मन ग्राह्कांविषयीच्या कृतज्ञतेने भरून येतें. माझे वडील, आप्पा दुकानातील ही गर्दी पाहून नेहमी म्हणतात असे संतुष्ट ग्राहक हेच आमच वैभव आहे. व्यवसायातील आता पर्यंतची हीच माझी मिळकत आहे. जी मला पैशांपेक्षा प्रिय आहे.
![]() |


